YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 15:1-15

योहान 15:1-15 MRCV

“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती तो छाटून टाकतो आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून तो तिची छाटणी करतो. कारण जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही अगोदरच शुद्ध झालाच आहात. म्हणून मजमध्ये राहा, व मी तुम्हामध्ये राहीन. कारण कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही. “मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही. जो कोणी माझ्यामध्ये राहत नाही, तुम्ही त्या फांदीसारखे आहात, जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून, आगीत टाकून जाळतात. परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल. तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी होईल. “जशी पित्याने मजवर प्रीती केली, तशीच मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. आता तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, तसे जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल. मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे कारण माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा. माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात. मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.

योहान 15 वाचा

योहान 15:1-15 साठी चलचित्र