“ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील. आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील. जिथे कुठेही मी या राष्ट्राला हद्दपार केले, या दुष्ट राष्ट्रातील सर्व वाचलेल्या लोकांना जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटेल, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.’
यिर्मयाह 8 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मयाह 8:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ