YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मयाह 31:3-6

यिर्मयाह 31:3-6 MRCV

कारण पूर्वी याहवेहने आम्हाला दर्शन दिले व म्हटले: “मी सार्वकालिक प्रीतीने तुमच्यावर प्रीती केली आहे; मी अविनाशी प्रेमदयेने तुम्हाला माझ्याकडे ओढून घेतले आहे. मी तुला पुन्हा उभारेन, आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. तू पुन्हा तुझे खंजीर घेशील आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील. शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील. ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे

यिर्मयाह 31 वाचा