आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते. मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता. तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली. परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला. त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
यशायाह 53 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशायाह 53:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ