YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 11:32-38

इब्री 11:32-38 MRCV

तर मग, मी आणखी किती उदाहरणे सांगावीत? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल आणि सर्व संदेष्टा यांच्या विश्वासाबद्दलच्या कथा सांगण्यासाठी मला वेळ नाही. विश्वासाद्वारे या सर्व लोकांनी राज्ये जिंकली, न्यायीपणाने सत्ता गाजवली, व वचनफळ प्राप्त केले; सिंहाची तोंडे बंद केली; आणि अग्निज्वालांच्या प्रकोपाला थंड केले; काहींचा तलवारीच्या धारेपासून बचाव झाला; काहीजण जे अशक्त होते, ते सबळ झाले; इतरांना लढाईमध्ये मोठे बळ प्राप्त झाले; त्यांनी परकीय सैन्ये परतवून व पळवून लावली. काही स्त्रियांना विश्वासाद्वारे त्यांचे मेलेले प्रियजन परत जिवंत असे मिळाले. पण दुसर्‍या काहींना विश्वासामुळे मरेपर्यंत छळ सोसावा लागला, तरीही सुटका करून घेण्यापेक्षा पुढे याहून चांगल्या जीवनात आपले पुनरुत्थान होईल, असा त्यांचा विश्वास होता. काहींची हेटाळणी झाली आणि त्यांना चाबकांचे फटके मारले गेले, तर इतरांना बेड्या ठोकून ते तुरुंगात टाकण्यात आले. काहींचा दगडमाराने मृत्यू झाला, तर काहींचे करवतीने दोन तुकडे करण्यात आले; काहींना तलवारीने ठार करण्यात आले, काहीजण बकर्‍यांची व मेंढयाची कातडी पांघरूण वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत. ते निराधार, पीडित व वाईट वागणूक मिळालेले असे होते. हे जग त्यांच्या योग्यतेचे नव्हते. ते वाळवंटात व पर्वतांवर भटकत असत व गुहांत आणि बिळांत राहत असत.

इब्री 11 वाचा