YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 32:13-21

उत्पत्ती 32:13-21 MRCV

त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली: त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके, तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली. प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.” पहिला कळप नेणार्‍या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’ त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ” याकोबाने दुसर्‍या, तिसर्‍या आणि इतर कळप हाकणार्‍याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे. हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.” म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.

उत्पत्ती 32 वाचा