एज्रा 2
2
यरुशलेमला परतलेल्या लोकांची यादी
1आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले. 2जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, सेरायाह, रेएलायाह, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाअनाह):
यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली पुरुषांची नावे ही:
3पारोशचे वंशज 2,172,
4शफाट्याहचे 372,
5आरहचे 775,
6पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,812,
7एलामचे 1,254,
8जत्तूचे 945,
9जक्काईचे 760,
10बानीचे 642,
11बेबाईचे 623,
12अजगादचे 1,222,
13अदोनिकामचे 666,
14बिग्वईचे 2,056,
15आदीनचे 454,
16हिज्कीयाहच्या कुळातले आतेरचे 98,
17बेसाईचे 323,
18योराहचे 112,
19हाशूमचे 223,
20गिब्बारचे 95,
21बेथलेहेमचे 123,
22नटोफाहचे 56,
23अनाथोथचे 128,
24अजमावेथचे 42,
25किर्याथ-यआरीम, कफीराह व बैरोथचे 743,
26रामाह व गेबाचे 621,
27मिकमाशचे 122,
28बेथेल व आयचे 223,
29नबोचे 52,
30मग्बिशचे 156,
31दुसऱ्या एलामचे 1,254,
32हारीमचे 320,
33लोद, हादीद व ओनोचे 725,
34यरीहोचे 345,
35सनाहाचे 3,630,
36याजकांचे वंशज:
यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,
37इम्मेरचे 1,052,
38पशहूरचे 1,247,
39हारीमचे 1,017,
40लेवीचे वंशज:
येशूआ व कदमीएलचे (होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74,
41संगीतकार:
आसाफचे वंशज 128,
42मंदिराचे द्वारपाल: खालील लोकांचे वंशजः
शल्लूमचे, आतेरचे, तल्मोनचे, अक्कूबचे, हतीताचे व शोबाईचे 139,
43मंदिराचे सेवकांचे वंशज:
झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,
44केरोसचे, सीआहाचे, पादोनचे,
45लबानाहचे, हगाबाहचे, अक्कूबचे,
46हागाबचे, शलमाईचे, हानानचे,
47गिद्देलचे, गहरचे, रेआयाहचे,
48रसीनचे, नकोदाचे, गज्जामचे,
49उज्जाचे, पासेआहचे, बेसाईचे,
50अस्नाहचे, मऊनीमचे, नफूसीमचे,
51बकबुकचे, हकूफाचे, हर्हूरचे,
52बसलूथचे, महीदाचे, हर्षाचे,
53बर्कोसचे, सिसेराचे, तामहचे,
54नसीयाहचे व हतीफाचे.
55शलोमोनच्या सेवकांचे वंशज:
सोताईचे, हसोफरतचे, परूदाचे,
56यालाहचे, दर्कोनचे, गिद्देलचे,
57शफाट्याहचे, हत्तीलचे,
पोखेरेथ-हज्ज़ेबाइमचे व आमीचे.
58मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज एकूण 392.
59पर्शियाचे तेल-मेलाह, तेल-हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या शहरातून पुढील लोक आले. पण त्यांच्या वंशावळी हरवल्यामुळे ते इस्राएली वंशज असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत.
60यांचे वंशज: दलायाहचे, तोबीयाहचे व नकोदाचे 652.
61आणि याजक पितृकुळातील वंशज:
हबयाहचे, हक्कोसचे व बारजिल्लईचे (बारजिल्लईने गिलआदी बारजिल्लई याच्या कन्यांपैकी एकीशी विवाह केला आणि त्याने तिच्या घराण्याचे नाव धारण केले होते.)
62यांनी आपल्या वंशावळींचा शोध घेतला, परंतु त्यांना ते सापडले नाही, म्हणून त्यांना अशुद्ध म्हणून याजकपदातून वगळण्यात गेले. 63राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणांतील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.
64सर्व सभेचे एकूण 42,360 लोक होते. 65याशिवाय त्यांचे 7,337 दास व दासी व 200 गायक व गायिका होत्या. 66त्यांनी आपल्याबरोबर 736 घोडे, 245 खेचरे, 67435 उंट आणि 6,720 गाढवे आणली होती.
68जेव्हा ते यरुशलेमात याहवेहच्या मंदिरात आले, काही कुलप्रमुखांनी परमेश्वराच्या भवनाची पुनर्बांधणी करण्यास त्या जागीच स्वेच्छेने दाने दिली. 69प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार जितके देणे शक्य होते तितके दिले. या कामासाठी 61,000 दारिक सोने#2:69 अंदाजे 500 कि.ग्रॅ., 5,000 मीना चांदी#2:69 अंदाजे 2.8 मेट्रिक टन व 100 याजकीय झगे भांडारात आणले.
70इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएल लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.
सध्या निवडलेले:
एज्रा 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.