YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहेज्केल 46

46
1“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: आतील अंगणाचे पूर्वेकडील द्वार कार्याच्या सर्व सहा दिवसा दरम्यान बंद असावे, परंतु शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी ते उघडे असावे. 2राजपुत्राने बाहेरून द्वाराच्या देवडीकडून जाणार्‍या मार्गाने प्रवेश करावा आणि चौकीकडे उभे राहावे. याजकांनी राजपुत्राच्या होमार्पण आणि शांत्यर्पणाचा यज्ञ करावा. त्याने द्वाराच्या उंबरठ्यावर उपासना करीत नमन करावे आणि त्यानंतर बाहेर जावे, परंतु संध्याकाळपर्यंत द्वार बंद करू नये. 3शब्बाथ दिवशी व अमावस्येच्या दिवशी देशातील लोकांनी त्या द्वारात याहवेहच्या समक्षतेत उपासना करावी. 4शब्बाथ दिवशी राजपुत्र जे होमार्पण म्हणून याहवेहसाठी आणेल, ते सहा कोकरे आणि एक एडका असून ते सर्व निर्दोष असावे. 5एका एडक्यासह दिलेले अन्नार्पण एक एफाह असावे आणि कोकर्‍याबरोबरचे धान्य त्याच्या आवडीनुसार एका एफाहसाठी एक हीन जैतून तेलाबरोबर द्यावे. 6अमावस्येच्या दिवशी त्याने एक गोर्‍हा, सहा कोकरे आणि एक एडका हे द्यावे, ते सर्व निर्दोष असावे. 7त्याने एका गोर्‍ह्यामागे एक एफाह व एका एडक्यामागे एक एफाह असे धान्यार्पण आणावे, आणि कोकर्‍याबरोबर आपल्या आवडीनुसार एक एफाह एक हीन तेलाबरोबर आणावे. 8जेव्हा राजपुत्र प्रवेश करतो, त्याने द्वाराच्या देवडीकडील मार्गाने जावे आणि त्याच मार्गाने त्याने परत यावे.
9“ ‘नेमलेल्या सणाच्या वेळी जेव्हा देशातील लोक याहवेहसमोर येतात, तेव्हा जो कोणी उपासना करण्यासाठी उत्तरेकडील द्वाराने आत येईल, त्याने दक्षिणेकडील द्वाराने बाहेर जावे; आणि जो कोणी दक्षिणेकडील द्वाराने आत येईल त्याने उत्तरेकडील द्वाराने बाहेर जावे. ज्या द्वाराने ते आत आले त्या द्वाराने कोणीही परत जाऊ नये, तर त्यांनी त्या समोरच्या द्वाराने जावे. 10राजपुत्राने देखील त्यांच्यासोबतच असावे, म्हणजेच लोक जेव्हा आत जातील तेव्हा आत जावे आणि बाहेर जातील तेव्हा त्यानेही बाहेर जावे. 11मेजवान्या आणि नेमलेल्या सणांच्या वेळी, एका गोर्‍ह्यामागे एक एफाह, एका एडक्यामागे एक एफाह आणि कोकर्‍यांबरोबर त्याला आवडेल त्याप्रमाणे धान्य आणावे आणि एका एफाहमागे एक हीन तेल आणावे.
12“ ‘जेव्हा राजपुत्र याहवेहला स्वैच्छिक अर्पण आणतो; ते होमार्पण असो वा शांत्यर्पण; त्याच्यासाठी पूर्वेकडील द्वार उघडावे. तो करतो त्याचप्रमाणे त्याचे होमार्पण किंवा शांत्यर्पण तो शब्बाथ दिवशी करेल. मग तो बाहेर जाईल आणि तो बाहेर गेल्यानंतर, द्वार बंद केले जाईल.
13“ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे. 14तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग#46:14 किंवा 2.7 कि.ग्रॅ. व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग#46:14 किंवा 1.3 लीटर धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा. 15याप्रमाणे दररोज सकाळी नियमित होमार्पणासाठी कोकरू आणि धान्यार्पण आणि तेल आणावे.
16“ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जर राजपुत्राने त्याच्या एका मुलासाठी आपल्या वतनातून काही भेट म्हणून दिली, ती त्याच्या वंशजांच्या मालकीची होईल; वारसानुसार ती त्यांची मालमत्ता होईल. 17तथापि, जर त्याने आपल्या वतनातून त्याच्या एखाद्या चाकराला काही भेट म्हणून दिले, तो चाकर स्वतंत्र होण्याच्या वर्षापर्यंत ती भेट ठेवू शकतो; मग ती पुन्हा राजपुत्राची होईल. राजपुत्राचे वतन केवळ त्याच्या मुलांच्याच मालकीचे आहे; ते त्यांचेच आहे. 18राजपुत्राने लोकांच्या वतनातून काही घेऊ नये, त्यांची मालमत्ता त्यांच्यापासून हिरावून घेऊ नये. त्याने त्याच्या मुलांना त्यांचा वाटा स्वतःच्या मालमत्तेतून द्यावा, म्हणजे माझ्या लोकांतून कोणीही त्यांच्या मालमत्तेपासून वंचित केला जाणार नाही.’ ”
19त्यानंतर त्या मनुष्याने मला बाजूच्या द्वाराच्या प्रवेशद्वाराने उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकांच्या पवित्र खोल्यांकडे आणले आणि पश्चिमेच्या शेवटाकडे असलेली एक जागा दाखविली. 20तो मला म्हणाला, “हे ते ठिकाण आहे जिथे याजकांनी दोषार्पण व पापार्पण शिजवावे आणि धान्यार्पण भाजावे, यामुळे बाहेरील अंगणात आणणे व लोकांना शुद्ध करण्याचे टाळता येईल.”
21नंतर त्याने मला बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याच्या चारही कोपऱ्यातून फिरविले आणि प्रत्येक कोपर्‍यात आणखी एक अंगण मी पाहिले. 22बाहेरील अंगणाच्या चार कोपर्‍यात चाळीस हात लांब आणि तीस हात रुंद#46:22 म्हणजेच 21 मीटर लांब आणि 16 मीटर रुंद अंगणे मला दिसली; चार कोपर्‍यातील प्रत्येक अंगण एकाच मापाचे होते. 23प्रत्येक अंगणाच्या आतील बाजूच्या कडेला दगडाची रांग होती, त्या काठांच्या खाली विस्तवासाठी चुली बांधलेल्या होत्या. 24तो मला म्हणाला, “या स्वयंपाकाच्या खोल्या आहेत जिथे मंदिरात सेवा करीत असलेल्या याजकांनी लोकांसाठी करीत असलेली अर्पणे शिजवावी.”

सध्या निवडलेले:

यहेज्केल 46: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन