YouVersion लोगो
सर्च आयकॉन

अनुवाद 6:10-12

अनुवाद 6:10-12 MRCV

जो देश देण्याचे वचन याहवेह तुमच्या परमेश्वराने तुमचे पूर्वज अब्राहाम, इसहाक व याकोबाला दिले होते, त्या देशात जेव्हा ते तुम्हाला घेऊन जातील व जी तुम्ही स्वतः वसविलेली नाहीत—अशी मोठी व सुंदर शहरे तुम्हाला देतील, तुम्ही स्वतः भरले नाहीत अशा सर्व चांगल्या वस्तूंनी भरलेली घरे, तुम्ही स्वतः खोदल्या नाहीत अशा विहिरी आणि तुम्ही स्वतः लावले नाहीत असे द्राक्षमळे व जैतुनाचे वृक्ष—तुम्ही ते सर्व खाल आणि तृप्त व्हाल, ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.

अनुवाद 6 वाचा