YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:24-31

दानीएल 5:24-31 MRCV

म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे. “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन. “या शब्दांचा अर्थ हा असा: “ मने : परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. “ तकेल : तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. “ फारसीन : आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.” नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले. त्याच रात्री खाल्डियन लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला; आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.

दानीएल 5 वाचा