दानीएलने राजाला उत्तर दिले. “आपल्या देणग्या आपल्याजवळच ठेवा आणि तुमचे पारितोषिक दुसर्या कोणाला द्या. तरीही मी हे लिखाण राजासाठी वाचेन आणि त्याचा अर्थ त्यांना सांगेन. “महाराज, परात्पर परमेश्वराने तुमचे पिता नबुखद्नेस्सर राजाला राज्य आणि महानता वैभव आणि गौरव दिले होते. कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत. परंतु जेव्हा त्यांचे अंतःकरण गर्विष्ठ झाले व गर्वाने फुगून ताठ झाले, तेव्हा त्यांना राजासनावरून काढण्यात आले व त्यांचे वैभवही हिरावून घेण्यात आले. त्यांना लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि प्राण्याचे मन देण्यात आले; ते रानगाढवांमध्ये राहिले आणि बैलासारखे गवत खात असत; आणि त्यांचे शरीर आकाशाच्या दवबिंदूंनी भिजले होते, जोपर्यंत त्यांनी हे मान्य केले नाही की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि त्यांना पाहिजे त्याला ते राज्यांचा अधिपती म्हणून नियुक्त करतात. “परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही.
दानीएल 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 5:17-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ