बेलशस्सर राजाने त्याच्या एक हजार अधिकार्यांना मोठी मेजवानी दिली आणि तो त्यांच्याबरोबर द्राक्षारस प्याला. बेलशस्सर द्राक्षारस पीत असताना, त्याने आज्ञा दिली की त्याचे पिता नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणावीत, जेणेकरून राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ शकतील. म्हणून यरुशलेमच्या मंदिरातून आणलेल्या सोन्याची आणि चांदीची पात्रे आणण्यात आली आणि राजा, त्याचे अधिकारी, त्याच्या पत्नी आणि त्याच्या उपपत्नी त्यामधून पिऊ लागली. द्राक्षारस पिऊन त्यांनी सोने, चांदी, कास्य, लोखंड, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या दैवतांचे स्तवन केले. एकाएकी मानवी हाताची बोटे प्रकट झाली आणि राजवाड्यातील दिवठणीच्या समोरच्या भिंतीच्या गिलाव्यावर काहीतरी लिहू लागली. ती हाताची बोटे लिहित असतानाच राजाने ती पाहिली. तेव्हा राजाचा चेहरा पांढराफटक झाला आणि त्याला एवढा धसका बसला की त्याची कंबरच खचली आणि त्याचे गुडघे थरथर कापू लागले. मग राजाने मांत्रिक, ज्योतिषी आणि दैवप्रश्न करणार्यांना बोलावून घेतले. नंतर तो बाबेलच्या ज्ञानी लोकांना म्हणाला, “जो कोणी हे लिखाण वाचून त्याचा अर्थ मला समजावून सांगेल, त्याला जांभळा पोशाख देण्यात येईल आणि गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात येईल आणि राज्यात तो तिसर्या क्रमांकाचा सत्ताधारी होईल.” नंतर राजाचे सर्व ज्ञानी लोक आत आले, पण त्यांना त्या लेखाचा उमज पडेना किंवा त्याचा अर्थही राजाला सांगता येईना. यामुळे राजा बेलशस्सर अत्यंत भयभीत झाला आणि त्याचा चेहरा अधिक पांढराफटक झाला. त्याचे अधिकारीदेखील गोंधळून गेले.
दानीएल 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: दानीएल 5:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ