YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 12

12
शेवटचा काळ
1“त्यावेळी तुमच्या लोकांचा रक्षक, समर्थ अधिपती मिखाएलचा उदय होईल. राष्ट्रांच्या सुरुवातीपासून आजतागायत कधीही आलेला नाही असा संकटाचा काळ येईल. परंतु त्यावेळी तुझ्या लोकांपैकी—ज्यांची नावे पुस्तकात नोंदलेली आहेत—त्या सर्वांची मुक्तता होईल. 2पृथ्वीच्या धुळीत झोपलेले बरेच लोक जागे होतील: काहीजण सर्वकाळच्या जीवनासाठी तर काही निर्लज्जता व सर्वकाळच्या अपमानासाठी उठतील. 3जे सुज्ञ आहेत#12:3 किंवा जे ज्ञान वाटतात ते आकाशातील प्रकाशासारखे प्रज्वलित होतील. तसेच अनेकांना नीतिमार्गाकडे वळवणारे सदासर्वकाळ तार्‍यांप्रमाणे चकाकतील. 4पण हे दानीएला, गुंडाळीतील ही वचने गुप्त ठेव आणि गुंडाळी शेवटच्या काळासाठी मोहोरबंद करून ठेव. पुष्कळजण इकडून तिकडे फिरतील आणि ज्ञान वाढत जाईल.”
5तेव्हा मी दानीएलाने पाहिले, नदीच्या या तीरावर एक आणि त्या तीरावर एक असे दोन पुरुष उभे असलेले मला दिसले. 6त्यांच्यातील एकाने तागाची वस्त्रे नेसलेल्या व आता नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाला विचारले, “आधी सांगितलेल्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती काळ लागेल?”
7तागाची वस्त्रे नेसलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या असलेल्या पुरुषाने आपला उजवा हात आणि त्याचा डावा हात स्वर्गाकडे उंचाविला व जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची शपथ देऊन सांगितले, “एक समय, दोन समय आणि अर्धा समय.#12:7 किंवा एक वर्ष, दोन वर्षे आणि अर्धे वर्ष शेवटी जेव्हा पवित्र लोकांच्या शक्तीचा नाश होईल तेव्हा या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
8हे मी ऐकले, पण त्यांचा अर्थ मला समजला नाही. म्हणून मी विचारले, “माझ्या प्रभू, या सर्वांचा शेवट कसा काय होणार?”
9त्याने उत्तर दिले, “हे दानीएला, आता जा, कारण अखेरचा काळ येईपर्यंत या गोष्टींना गुंडाळून आणि शिक्का मारून बंद करण्यात आले आहे. 10पुष्कळ लोक शुद्ध, निष्कलंक आणि निर्मळ केले जातील, परंतु दुष्ट आपल्या दुष्टपणातच मग्न राहतील; एकाही दुष्टाला या गोष्टी समजणार नाही, परंतु जे सुज्ञ आहेत त्यांनाच याचा अर्थ काय ते समजेल.
11“रोजचे यज्ञार्पण बंद होईल व ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापित होईल तेव्हापासून 1,290 दिवस लोटतील. 12धन्य ते जे 1,335 दिवस वाट पाहत राहतील आणि शेवट पाहतील.
13“आता तू शेवटपर्यंत तुझ्या मार्गाने जा. तू विसावा घेशील आणि तुझ्यासाठी राखून ठेवण्यात आलेले तुझे संपूर्ण वतन घेण्यासाठी तू पुन्हा उठशील.”

सध्या निवडलेले:

दानीएल 12: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन