YouVersion लोगो
सर्च आयकॉन

कलस्सैकरांस 1:4-12

कलस्सैकरांस 1:4-12 MRCV

कारण ख्रिस्त येशूंमध्ये असलेला तुमचा विश्वास, आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले आहे. विश्वास व प्रीती यामुळे निर्माण होणारी आशा जी स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवली आहे व ज्याबद्दल तुम्ही शुभवार्तेच्या सत्याचा संदेश आधी ऐकला आहे, ज्या दिवसापासून तुम्ही ती शुभवार्ता ऐकली व परमेश्वराची कृपा तुम्हाला त्याद्वारे समजून आली व तुमच्यामध्येही ती वाढत आहे, त्याचप्रमाणे ती आता जगभर वृद्धिंगत होऊन फळ देत आहे. आमचा अतिप्रिय सहकारी एपफ्रास याच्याकडून तुम्ही शिकला, तो आमच्यावतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक आहे. पवित्र आत्म्यामध्ये तुमची प्रीती याबद्दलही त्यानेच आम्हाला सांगितले. म्हणूनच आम्ही ज्या दिवशी तुमच्याविषयी ऐकले, तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही परमेश्वराजवळ सतत मागतो की त्यांनी तुम्हाला आत्म्याद्वारे दिले जाणारे सर्व ज्ञान व समज यांच्याद्वारे त्यांच्या इच्छेच्या ज्ञानाने भरावे; त्यामुळे प्रभूला आवडेल असे योग्य जीवन तुम्ही जगावे व प्रत्येक बाबतीत त्यांना प्रसन्न करावे. चांगल्या कृत्यांद्वारे फळ देणारे, परमेश्वराच्या ज्ञानात वाढणारे, धीर व सहनशक्ती ही अधिक रीतीने तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणून त्यांच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्वप्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे आणि आनंदाने त्या पित्याचे आभार मानणारे व्हा, ज्यांनी प्रकाशाच्या राज्यामध्ये असलेल्या पवित्र लोकांच्या वतनामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला पात्र ठरविले आहे.