“त्याच मोशेला, ‘तुला आमच्यावर अधिपती व न्यायाधीश कोणी नेमले?’ असे विचारुन पूर्वी झिडकारीले होते, त्याला परमेश्वराने स्वतः शासक व मुक्त करणारा म्हणून झुडूपात प्रकट झालेल्या दूताच्या द्वारे त्यांच्याकडे परत पाठविले. आणि अनेक अद्भुत कृत्ये व चिन्हे करून त्याने त्यांना इजिप्त देशामधून, तांबड्या समुद्रातून आणि चाळीस वर्षे रानातून बाहेर काढले. “तोच मोशे ज्याने इस्राएल लोकांना सांगितले होते, ‘परमेश्वर, तुमच्या बांधवांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा उठवेल;’ तो अरण्यात लोकसमुदायाबरोबर होता आणि सीनाय पर्वतावर परमेश्वराचा दूत जो त्याच्याशी आणि आपल्या पूर्वजांशी बोलला आणि आपल्याला देण्याकरीता जिवंत वचने त्याला मिळाली. “परंतु आपले पूर्वज त्याचे ऐकावयास तयार नव्हते. या व्यतिरिक्त, त्यांनी त्यास स्वीकारले नाही कारण इजिप्तकडे परत जाण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. त्यांनी अहरोनाला सांगितले, ‘आमच्यासाठी तू देवांना तयार कर, म्हणजे ते आमच्यापुढे जातील. कारण ज्याने आम्हाला इजिप्तमधून काढून आणले त्या मोशेचे काय झाले ते आम्हाला माहीत नाही!’
प्रेषित 7 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 7:35-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ