YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 4:24-37

प्रेषित 4:24-37 MRCV

त्यांचे हे विवरण ऐकून सर्व विश्वासणार्‍यांनी मोठ्या स्वराने मिळून परमेश्वराकडे प्रार्थना केली: “सार्वभौम प्रभू” तुम्ही आकाश, पृथ्वी, सागर व त्यांतील सर्वकाही निर्माण केले आहे. पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्ही, तुमचा सेवक आणि आमचा पिता दावीद याच्या मुखातून बोलला आहात: “ ‘राष्ट्रे क्रोधाने का खवळतात आणि जाती व्यर्थ बेत का रचतात? पृथ्वीवरील राजे उठले आहेत आणि शासक लोक एकत्र आले आहेत, प्रभुविरुद्ध आणि त्यांच्या अभिषिक्ताविरुद्ध.’ खरोखर हेरोद राजा आणि राज्यपाल पंतय पिलात आणि सर्व गैरयहूदी आणि त्याचप्रमाणे या शहरात राहणारे इस्राएल लोक तुमचा पवित्र सेवक येशू ज्यांचा तुम्ही अभिषेक केला आहे, त्यांच्याविरुद्ध कट कारस्थान करण्यास एकत्र आले. तुमच्या शक्तीने आणि इच्छेने जे घडावे असे तुम्ही योजले होते तेच त्यांनी केले. तर आता, हे प्रभू, त्यांच्या धमक्यांकडे लक्ष द्या आणि मोठ्या धैर्याने तुमचे वचन सांगण्यासाठी तुमच्या सेवकांना सामर्थ्य द्या. तुमचा पवित्र सेवक येशू यांच्या नावामध्ये आजार बरे होण्यासाठी, चिन्हे आणि आश्चर्यकारक गोष्टी करून दाखविण्यासाठी तुम्ही आपला हात लांब करा.” या प्रार्थनेनंतर, ज्या ठिकाणी ते जमले होते, ती हादरली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन धैर्याने परमेश्वराचे वचन सांगू लागले. त्यावेळी सर्व विश्वासणारे एक हृदयाचे आणि एकमनाचे होते. त्यांच्यापैकी कोणीही त्यांची संपत्ती स्वतःची आहे असे हक्काने सांगत नव्हते, परंतु त्यांच्याकडे असलेले सर्वकाही त्यांनी समाईक मानले होते. प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाविषयी प्रेषित मोठ्या शक्तीने सतत साक्ष देत राहिले आणि त्या सर्वांवर परमेश्वराची विपुल कृपा शक्तीने कार्य करीत होती. त्यांच्यामध्ये गरजवंत असा कोणीही राहिला नव्हता. कारण घर व जमिनीचे जे मालक होते ते त्यांची घरे व जमिनी विकून आलेले पैसे प्रेषितांच्या चरणी आणून ठेवीत होते आणि जे कोणी गरजवंत होते, त्यांना वाटून देत. योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते, त्याने त्याच्या मालकीची शेतजमीन विकून मिळालेली रक्कम प्रेषितांच्या चरणी आणून ठेवली.

प्रेषित 4 वाचा

प्रेषित 4:24-37 साठी चलचित्र