पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तेथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती परंतु त्याचे वडील ग्रीक होते. लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते. पौलाला त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे, पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते. गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले. म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली. त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते. मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही. म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले. रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टांतात असे पाहिले की मासेदोनियातील माणूस उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे की, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.” पौलाने हा दृष्टांत पाहिल्यानंतर, आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलावले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली. आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस व दुसर्या दिवशी नियापुलीस येथे गेलो. तेथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्वाचे नगर होते तेथे गेलो. तेथे आम्ही बरेच दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तेथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तेथे बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली. त्या ऐकणार्या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभुने तिचे हृदय उघडले. मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला, व तिने आम्हाला तिच्या घरी बोलावले. “मी प्रभुवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर,” ती म्हणाली “या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.
प्रेषित 16 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 16:1-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ