YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषित 10:6-16

प्रेषित 10:6-16 MRCV

ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.” जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले. घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले. दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला. त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले. त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे. तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती. मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.” “खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.” दुसर्‍या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.” असे तीन वेळा झाले, मग लागलीच ती चादर पुन्हा स्वर्गात वर घेतली गेली.

प्रेषित 10:6-16 साठी चलचित्र