YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 3:12-17

2 तीमथ्य 3:12-17 MRCV

खरे पाहिले तर ख्रिस्त येशूंमध्ये जे सुभक्तीने जीवन जगण्याचा निश्चय करतात, त्या सर्वांचा छळ होईल. परंतु दुष्ट आणि भोंदू लोक हे दुसर्‍यांना फसवून आणि स्वतः फसून अधिक वाईटाकडे जातील. परंतु तुझ्यासाठी, तू ज्यागोष्टी शिकलास, ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे, त्या धरून राहा; कारण त्या तू कोणापासून शिकलास तुला माहीत आहे. लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते. संपूर्ण पवित्रशास्त्र परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेले आहे आणि शिक्षण, निषेध, सुधारणा, नीतिमत्वाचे शिक्षण याकरिता उपयोगी आहे. यासाठी की, परमेश्वराचा सेवक पूर्णपणे प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.