YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 17:1-17

2 शमुवेल 17:1-17 MRCV

अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे. जेव्हा तो थकलेला आणि दुर्बल असेल तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करेन. मी त्याला भीतीचा धक्का देईन आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक पळून जातील. मी केवळ राजावरच वार करेन आणि सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणेन. ज्या मनुष्याचे मरण तू इच्छितो, तो मेला म्हणजे सर्व लोक सुरक्षित परत येतील; कोणालाही हानी होणार नाही.” अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडिलांना ही योजना चांगली वाटली. परंतु अबशालोम म्हणाला, “हूशाई अर्कीलासुद्धा बोलावून घ्या, म्हणजे त्याचे म्हणणे काय आहे ते आम्ही पाहू.” जेव्हा हूशाई त्याच्याकडे आला, तेव्हा अबशालोम म्हणाला, “अहीथोफेलने हा सल्ला दिला आहे. तो जे म्हणतो ते आपण करावे काय? नाहीतर तुझा सल्ला आम्हाला दे.” हूशाईने अबशालोमला उत्तर दिले, “अहीथोफेलने जो सल्ला दिला आहे, तो यावेळेसाठी बरा नाही. हूशाईने पुढे म्हटले, तुझे वडील आणि त्याची माणसे यांना तू चांगले ओळखतोस; ते योद्धे आहेत, रानटी अस्वलाची पिल्ले कोणी नेली तेव्हा ती कशी चवताळते त्यासारखे ते आहेत, तुझे वडील अनुभवी योद्धा आहेत; आणि तो सैन्याबरोबर रात्र घालविणार नाही. यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्‍या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्‍यांचीच हत्या होत आहे.’ तेव्हा सर्वात धैर्यशाली शिपाई, ज्याचे हृदय एखाद्या सिंहासारखे आहे तो भीतीने गळून जाईल, कारण सर्व इस्राएली लोकांना माहीत आहे की, तुझा पिता योद्धा आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व शूर आहेत. “म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर. मग तो सापडेल तिथे आपण त्याच्यावर हल्ला करू, आणि जसे जमिनीवर दव येऊन पडते तसे आपण त्याच्यावर पडू. मग तो किंवा त्याच्या माणसांपैकी कोणीही जिवंत सोडला जाणार नाहीत. जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.” तेव्हा अबशालोम आणि सर्व इस्राएली लोक म्हणाले, “हूशाई अर्कीचा सल्ला अहीथोफेलच्या सल्ल्यापेक्षा अधिक बरा आहे.” कारण अबशालोमवर अरिष्ट आणावे म्हणून अहीथोफेलचा चांगला सल्ला विफल करण्याची याहवेहने योजना केली होती. हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे. आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ” आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली गेली.

2 शमुवेल 17 वाचा