YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 6:14-18

2 राजे 6:14-18 MRCV

मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला. दुसर्‍या दिवशी पहाटेच परमेश्वराच्या मनुष्याचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैनिकांनी रथ आणि घोडे यासह शहराला वेढा दिला आहे, हे त्याला दिसले. तेव्हा तो ओरडला, “माझ्या स्वामी, आता आपण काय करावे?” संदेष्ट्याने उत्तर दिले, “भिऊ नकोस, कारण हे त्यांच्यासोबत जे आहेत त्यांच्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत ते अधिक आहेत.” मग अलीशाने ही प्रार्थना केली, “हे याहवेह, याचे डोळे उघडा, म्हणजे तो पाहू शकेल.” तेव्हा याहवेहने त्या सेवकाचे डोळे उघडले, आणि त्याने दृष्टी वर केली आणि पाहिले की, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे आणि रथ यांनी भरलेला आहे. जेव्हा शत्रू खाली त्याच्याकडे आले, तेव्हा अलीशाने याहवेहकडे प्रार्थना केली, “कृपा करून या सर्व लोकांना आंधळे करून टाका.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले.

2 राजे 6 वाचा