YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 27

27
यहूदीयाचा राजा योथाम
1वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती. 2त्याचे पिता उज्जीयाहने जसे केले तसे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले; परंतु त्याने याहवेहच्या मंदिरात प्रवेश केला नाही. तथापि लोकांनी त्यांचे भ्रष्ट व्यवहार सुरूच ठेवले. 3योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला आणि ओफेलच्या डोंगरावरील भिंतीवर बरेच काम केले. 4त्याने यहूदीयाच्या डोंगराळ प्रदेशात नगरे बांधली आणि जंगली भागात किल्ले आणि बुरूज बांधले.
5योथामाने अम्मोन्यांच्या राजाशी युद्ध करून त्यांना जिंकले. त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर तालांत#27:5 अंदाजे 3.4 मेट्रिक टन चांदी, दहा हजार कोर#27:5 अंदाजे 1,600 मेट्रिक टन गहू आणि दहा हजार कोर#27:5 अंदाजे 1,350 मेट्रिक टन जव दिले. अम्मोनी लोकांनी दुसऱ्या आणि तिसर्‍या वर्षी देखील त्याच प्रमाणात वस्तू आणल्या.
6योथाम सामर्थ्याने वाढत गेला, कारण तो त्याचे परमेश्वर याहवेहसमोर स्थैर्याने चालला.
7योथामच्या राज्यकाळातील इतर घटना, त्याने केलेली सर्व युद्धे आणि इतर गोष्टी इस्राएलचे राजे आणि यहूदीयाचे राजे यांच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत. 8वयाच्या पंचवीसाव्या वर्षी योथाम राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. 9योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि त्याचा पुत्र आहाज त्याचा वारस म्हणून राजा झाला.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 27: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन