बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभुमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्या मान राखा. त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतिने सर्वोच्च मान द्या एकमेकांबरोबर शांतीने राहा. बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबूड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा. कोणी वाईटाची फेड वाईटाने करीत नाही याची खात्री बाळगा, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.
1 थेस्सलनीकाकरांस 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 थेस्सलनीकाकरांस 5:12-15
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ