YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 19:4-8

1 राजे 19:4-8 MRCV

तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.” नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.” त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्‍यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला. याहवेहचा दूत परत दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.” तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला.

1 राजे 19 वाचा