आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.” म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले. तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले. तो म्हणाला, “काही दिसत नाही.” सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.” सातव्या वेळेस सेवकाने सांगितले, “मनुष्याच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येत आहे.” एलीयाह म्हणाला, “जा आणि अहाबाला सांग, ‘पावसाने तुला थांबविण्याआधी, रथ जुंपून खाली जा.’ ” थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला.
1 राजे 18 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 राजे 18:41-45
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ