येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकारतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात, आणि ते परमेश्वरामध्ये राहतात. परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहे. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला धैर्य प्राप्त व्हावे. या जगात आपण येशू सारखे आहोत. प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो.
1 योहान 4 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 योहान 4:15-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ