YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 8:29-40

1 इतिहास 8:29-40 MRCV

गिबोनचा पिता ईयेल, गिबोन येथे स्थायिक झाला. त्याच्या पत्नीचे नाव माकाह. त्याच्या पुत्रांची नावे: ज्येष्ठ अब्दोन, मग सूर, कीश, बाल, नेर, नादाब, गदोर, अहियो, जेखर आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली. नेराला कीश झाला, कीशाला शौल, शौलाला योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश-बाल हे पुत्र झाले. योनाथानाचा पुत्र: मरीब-बाल ला मीखाह झाला. मीखाहचे पुत्र: पीथोन, मेलेख, तरेया व आहाज. आहाजास यहोअद्दा, यहोअद्दाहास आलेमेथ, अजमावेथ व जिम्री, जिम्रीस मोसा. मोसाला बिना, बिनाला राफाह, राफाहला एलीयासाह, व एलीयासाहला आजेल झाले. आजेलास सहा पुत्र होते. त्यांची नावे अशी: अज्रीकाम, बोखेरू, इश्माएल, शिआरियाह, ओबद्याह व हानान. हे सर्व आजेलाचे पुत्र. त्याचा भाऊ एशेकाचे पुत्र: ज्येष्ठ ऊलाम, दुसरा यऊश व तिसरा एलिफेलेत. ऊलामाचे वंशज शूरवीर असून धनुर्धारी होते; त्यांचे पुत्र पौत्रे एकूण 150 लोक. हे सर्व बिन्यामीनचे वंशज होते.

1 इतिहास 8 वाचा