लेवीचे पुत्र:
गेर्षोन, कोहाथ व मरारी.
ही गेर्षोनच्या पुत्रांची नावे:
लिब्नी व शिमी.
कोहाथाचे पुत्र:
अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
मरारीचे पुत्र:
महली व मूशी.
त्यांच्या पूर्वजांप्रमाणे नोंदवलेली लेव्यांची कुळे:
गेर्षोमाच्या कुळातील:
गेर्षोमचा पुत्र लिब्नी, लिब्नीचा पुत्र यहथ,
यहथाचा पुत्र जिम्माह, जिम्माहाचा पुत्र योवाह,
योवाहचा पुत्र इद्दो, इद्दोचा पुत्र जेरह,
जेरहचा पुत्र जेथेराय.
कोहाथाचे वंशज:
कोहाथाचा पुत्र अम्मीनादाब, अम्मीनादाबाचा पुत्र कोरह,
कोरहाचा पुत्र अस्सीर, अस्सीरचा पुत्र एलकानाह,
एलकानाहचा पुत्र एब्यासाफ, एब्यासाफाचा पुत्र अस्सीर,
अस्सीरचा पुत्र तहथ, तहथाचा पुत्र उरीएल,
उरीएलाचा पुत्र उज्जीयाह आणि त्याचा पुत्र शौल.
एलकानाहचे वंशज:
अमासय व अहीमोथ.
एलकानाहचा पुत्र सोफय, सोफयाचा पुत्र नहाथ,
नहाथाचा पुत्र एलियाब, एलियाबाचा पुत्र,
यरोहाम व त्याचा पुत्र एलकानाह,
एलकानाहचा पुत्र शमुवेल.
शमुवेलाचे पुत्र:
ज्येष्ठ योएल
व दुसरा अबीयाह.
मरारीचे वंशज:
महली, त्याचा पुत्र लिब्नी,
त्याचा पुत्र शिमी, त्याचा पुत्र उज्जाह,
त्याचा पुत्र शिमा, त्याचा पुत्र हग्गीयाह
व त्याचा पुत्र असायाह.