YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 5

5
रऊबेन
1रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही. 2जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला. 3इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र:
हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.
4योएलाचे वंशज:
त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग,
त्याचा पुत्र शिमी, 5शिमीचा पुत्र मीखाह,
त्याचा पुत्र रेआयाह, त्याचा पुत्र बाल,
6बालाचा पुत्र बैरा रऊबेन वंशाचा सरदार असून त्याला अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर#5:6 तिग्लथ-पिलेसर याला तिग्लथ-पिल्नेसर म्हणूनही ओळखले जाते ने कैद करून नेले.
7त्याच्या भावांची वंशावळी त्यांच्या कुळांप्रमाणे लिहिली ती अशी:
प्रमुख ईयेल, जखर्‍याह, 8बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल.
हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला. 9पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते.
10शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्‍यात ते वस्ती करू लागले.
गाद
11गादाचे वंशज त्यांच्यासमोर सलेकाह येथवर बाशान प्रदेशात राहत होते:
12त्यात योएल प्रमुख होता व दुसरा शाफाम, याखेरीज यानय व शाफाट हे बाशानात राहत होते.
13त्यांच्या पितृकुळाप्रमाणे त्यांचे बांधव:
मिखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया व एबर; असे सर्व मिळून सात.
14अबीहाईल हूरीचा पुत्र, जो दूरीचा पुत्र, जो यारोहचा पुत्र, जो गिलआदाचा पुत्र, जो मिखाएलचा पुत्र, जो यशीशायचा पुत्र, जो यहदोचा पुत्र, जो बूजचा पुत्र.
15अही जो अबदीएलचा पुत्र, जो गूनीचा पुत्र हा त्यांच्या कुटुंबाचा प्रमुख होता.
16गादचे लोक गिलआदात व बाशानात व तेथील गावात आणि शारोनच्या शिवारात आपल्या सीमेत वस्ती करून राहिले.
17या सर्वांची वंशावळी यहूदीयाचा राजा योथाम व इस्राएलचा राजा यरोबोअम यांच्या कारकिर्दीत संग्रहित करण्यात आली होती.
18रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे. 19त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले. 20त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली. 21त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले. 22बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले.
मनश्शेहचा अर्धा वंश
23मनश्शेहच्या अर्ध्या वंशातील लोक असंख्य होते. त्यांनी बाशानपासून बआल-हर्मोन, सनीरपर्यंत (हर्मोन पर्वत) वस्ती केली.
24त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पुरुष: एफेर, इशी, एलीएल, अज्रीएल, यिर्मयाह, होदव्याह व यहदीएल. हे महावीर व नामांकित पुरुष असू कुलप्रमुख होते. 25ते आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराशी अविश्वासू झाले आणि परमेश्वराने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांच्या नादी लागून ते व्यभिचारी बनले. 26यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन