रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रात 44,760 पुरुष योद्धे होते—ढालधारी, तलवारबहादूर, धनुर्धारी व युध्दकलानिपुण असे. त्यांनी हगरी, यतूर, नापीश व नोदाब यांच्याशी युद्ध केले. त्यांच्याशी लढण्यास त्यास साहाय्य मिळून परमेश्वराने हगरी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर लोकांना त्यांच्या हातात दिले, कारण युध्दसमयी त्यांनी परमेश्वराचा धावा केला; त्यांनी त्यांच्यावर भरवसा ठेवला म्हणून त्यांनी त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांनी त्यांची गुरे जप्त केली—पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे व एक लक्ष पुरुष कैद करून नेले. बऱ्याच लोकांचा संहार झाला, कारण हे युद्ध परमेश्वराचे होते. ते लोक या प्रदेशात बंदिवासाच्या समयापर्यंत वस्ती करून राहिले. मनश्शेहच्या अर्ध्या वंशातील लोक असंख्य होते. त्यांनी बाशानपासून बआल-हर्मोन, सनीरपर्यंत (हर्मोन पर्वत) वस्ती केली. त्यांच्या कुटुंबातील प्रमुख पुरुष: एफेर, इशी, एलीएल, अज्रीएल, यिर्मयाह, होदव्याह व यहदीएल. हे महावीर व नामांकित पुरुष असू कुलप्रमुख होते. ते आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराशी अविश्वासू झाले आणि परमेश्वराने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता, त्यांच्या दैवतांच्या नादी लागून ते व्यभिचारी बनले. यास्तव इस्राएलाच्या परमेश्वराने अश्शूरचा राजा पूल (म्हणजे अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर), यास तयार केले. त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेहच्या अर्ध्या वंशाच्या लोकांचा पाडाव करून त्यांना हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत नेऊन बंदिवासात ठेवले व तिथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.
1 इतिहास 5 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 इतिहास 5:18-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ