YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 23

23
लेवी
1जेव्हा दावीद वृद्ध व वयातीत झाला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनला इस्राएलचा राजा बनविले.
2त्याने इस्राएलांच्या सर्व पुढार्‍यांना आणि लेवी व याजकांना एकत्र केले. 3तीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लेव्यांची शिरगणती करण्यात आली. त्यांची संख्या अडतीस हजार भरली. 4दावीद म्हणाला, “यापैकी चोवीस हजार लेव्यांनी याहवेहच्या मंदिराच्या कामावर मुकादम म्हणून देखरेख करावी, सहा हजार लोकांनी न्यायाधीशांची आणि अंमलदारांची कामे करावी. 5चार हजार लोकांनी मंदिराच्या द्वारपालांचे काम करावे आणि चार हजार लोकांनी मी पुरवठा केलेली वाद्ये वाजवून याहवेहचे स्तुतिगान करावे.”
6नंतर दावीदाने लेवींची विभागणी करून त्यांचे त्यांच्या संततीनुसार भाग पाडले: गेर्षोन, कोहाथ व मरारी.
गेर्षोनी
7गेर्षोनीचे विभाग:
लादान व शिमी.
8लादानाचे पुत्र:
यात यहीएल हा ज्येष्ठ, जेथाम व योएल—सर्व मिळून तीन.
9शिमीचे पुत्र:
शेलोमीथ, हजिएल व हारान; सर्व मिळून तीन.
(हे लादानाचे कुटुंबप्रमुख.)
10शिमीचे पुत्र:
यहथ, जीजा,#23:10 किंवा झिना यऊश आणि बरीयाह.
हे शिमीचे पुत्र; सर्व मिळून चार.
11(यहथ हा ज्येष्ठ होता, जीजाह हा दुसरा होता, परंतु यऊश आणि बरीयाह यांना पुष्कळ पुत्र नव्हते; म्हणून ते एकच कुटुंब म्हणून ओळखले जात.)
कोहाथी
12कोहाथाचे पुत्र:
अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल; सर्व मिळून चार पुत्र.
13अम्रामचे पुत्र:
अहरोन व मोशे.
अहरोनाला आणि त्याच्या वंशाला सर्वकाळाकरिता वेगळे करण्यात आले, जेणेकरून त्यांनी याहवेहसाठी अतिपवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी व त्यांच्या नावाने अनंतकालाकरिता आशीर्वाद द्यावे. 14परमेश्वराचा मनुष्य मोशे याच्या पुत्रांचाही समावेश लेवीच्या गोत्रात केला होता.
15मोशेचे पुत्र:
गेर्षोम व एलिएजर.
16गेर्षोमाचे वंशज:
शबुएल प्रथमपुत्र होता.
17एलिएजरचे वंशज:
रहब्याह प्रथमपुत्र होता.
(एलिएजरला दुसरा पुत्र नव्हता, परंतु रहब्याहाला पुष्कळ पुत्र झाले.)
18इसहारचे पुत्र:
शेलोमीथ प्रथमपुत्र होता.
19हेब्रोनाचे पुत्र:
यरीयाह हा प्रथमपुत्र होता, अमर्‍याह दुसरा,
यहजिएल तिसरा आणि यकमाम चौथा.
20उज्जीएलाचे पुत्र:
मीखाह हा प्रथमपुत्र व इश्शीयाह दुसरा.
मरारी
21मरारीचे पुत्र:
महली व मूशी.
महलीचे पुत्र:
एलअज़ार व कीश.
22एलअज़ारला पुत्र नव्हता: त्याला फक्त कन्याच होत्या. त्यांचे चुलतभाऊ कीशपुत्र यांनी त्यांच्याशी विवाह केले.
23मूशीचे पुत्र:
महली, एदर व यरेमोथ; सर्व मिळून तीन.
24लेव्याच्या शिरगणतीमधील सर्व लेवी पुरुष—ज्या कुटुंब प्रमुखांची नावे समाविष्ट केली व त्यांची नावनोंदणी झाली, जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे होते, त्या सर्वांना याहवेहच्या मंदिरात सेवाकार्य दिले गेले. 25कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत. 26म्हणून लेव्यांना निवासमंडप व इतर सर्व सेवा साधने एका जागेवरून दुसर्‍या जागी नेण्याची गरज राहणार नाही.” 27दावीदाच्या शेवटच्या सूचनेनुसार, वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या लेवींची शिरगणती केली गेली.
28लेव्यांचा कार्यभाग, अहरोनाच्या वंशजांना याहवेहच्या मंदिराच्या सेवेत याप्रमाणे मदत करावी: अंगणाची देखरेख, इतर खोल्यांची देखरेख, सर्व पवित्र वस्तूंचे शुद्धीकरण आणि परमेश्वराच्या भवनातील इतर कामे करणे. 29त्यांना समक्षतेची भाकर टेबलावर ठेवणे, अन्नार्पणांसाठी लागणारे विशिष्ट सपीठ ठेवणे, बेखमीर पापड्या तयार करणे, भाजणे व मिश्रण तयार करणे व सर्व वजन आणि मापाचे प्रमाण बघणे या जबाबदाऱ्या होत्या. 30दररोज सकाळी याहवेहसमोर उभे राहून ते उपकारस्तुतीचे स्तवनगान करीत असत व संध्याकाळीही ते हीच कामे करीत. 31शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या दिवशी आणि इतर सणांमध्ये विशेष होमार्पणाच्या कामात ते नित्यनेमाने याहवेहची सेवा त्यांना नेमून दिल्यानुसार करीत होते.
32याप्रमाणे याहवेहच्या मंदिरात लेवी सभामंडपाची आणि पवित्रस्थानाची काळजी घेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत असत आणि त्यांचे नातलग अहरोनाचे वंशज यांच्या मदतनीसाचे काम करीत असत.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन