YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 14

14
दावीदाचे घर व कुटुंब
1आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले व दावीदासाठी राजवाडा बांधावा म्हणून त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे, गवंडी व सुतार पाठवले. 2आणि दावीदाने जाणले की याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य खूप उंचावले आहे.
3यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या. 4यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन, 5इभार, एलीशुआ, एल्पलेट, 6नोगा, नेफेग, याफीय, 7एलीशामा, बिलिआदा#14:7 किंवा एलयादा व एलिफेलेत.
दावीद पलिष्ट्यांचा पराभव करतो
8इस्राएलवर राजा म्हणून दावीदाचा अभिषेक झाला आहे असे पलिष्ट्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा ते त्याला शोधण्यासाठी आपले सर्व सैन्य घेऊन निघाले, परंतु दावीदाने याबद्दल ऐकले तेव्हा तो त्यांना भेटण्यास गेला. 9इकडे पलिष्टी लोकांनी येऊन रेफाईमच्या खोर्‍याला लुटले. 10तेव्हा दावीदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन पलिष्ट्यांवर हल्ला करू काय? आपण त्यांना माझ्या हाती देणार काय?”
याहवेहने त्याला उत्तर दिले, “जा, मी त्यांना तुझ्या हातात देईन.”
11म्हणून दावीद व त्याचे सैन्य बआल-पेरासीम येथे गेले आणि तिथे त्याने त्यांचा पराभव केला. दावीद म्हणाला, “पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे परमेश्वराने माझ्याद्वारे शत्रूंचा नाश केला आहे.” म्हणून त्या ठिकाणाला बआल-पेरासीम#14:11 अर्थात् परमेश्वर जे तुटून पडतात, हे नाव पडले. 12पलिष्टी लोकांनी त्यांची दैवते टाकून दिली व दावीदाने ती अग्नीत जाळून टाकण्याची आज्ञा केली.
13पुन्हा एकदा पलिष्टी लोकांनी खोर्‍यात हल्ला केला. 14तेव्हा दावीदाने पुन्हा परमेश्वराला विचारले, आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिले, “थेट त्यांच्यामागे जाऊ नकोस, पण त्यांच्या बाजूने वळसा देऊन, तुतीच्या झाडांसमोरून त्यांच्यावर हल्ला कर. 15तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सैन्य चालत येण्याचा आवाज येताच, युद्धास पुढे निघा, त्यावरून पलिष्टी सैन्याचा नाश करण्यासाठी परमेश्वर तुमच्यापुढे गेले आहेत असे समज.” 16तेव्हा दावीदाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गिबोनापासून गेजेरपर्यंत त्यांनी पलिष्टी सैन्यांना ठार केले.
17दावीदाची किर्ती संपूर्ण प्रदेशात पसरत गेली. सर्व राष्ट्रांना त्याचे भय वाटावे असे याहवेहने केले.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 14: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन