तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मरण पावला इतकेच नव्हे तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तर मग ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? अडचणी, तणाव, दुष्काळ, छळ, दारिद्र्य, संकट किंवा तलवार ह्या गोष्टी विभक्त करतील काय? धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते. उलटपक्षी, ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो! कारण माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, बले, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, उंची किंवा खोली, इतर कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही.
रोमकरांना 8 वाचा
ऐका रोमकरांना 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 8:34-39
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ