नियमशास्त्रातील कृत्यांनी कोणीही मनुष्य देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही. नियमशास्त्राद्वारे पापाची जाणीव होते. मात्र आता पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित करण्याची देवाची पद्धत नियमशास्त्राविना अमलात आणली जात आहे आणि तिला नियमशास्त्राचा व संदेष्ट्यांचा दुजोरा आहे. ही देवाची पद्धत सर्वांसाठी त्यांच्या येशू ख्रिस्तावरील श्रद्धेवर आधारित आहे. ह्या बाबतीत भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या वैभवास उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने एक दान म्हणून सर्व लोक ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे देवाबरोबर नीतिमान ठरले आहेत. त्याच्या आत्मबलिदानाद्वारे त्याने सर्वांसाठी क्षमा मिळवावी व ख्रिस्तावरील श्रद्धेने सर्वांनी ही क्षमा आपलीशी करावी म्हणून देवाने ख्रिस्त अर्पण केला. देवाने हे अशासाठी केले की, तो स्वतः नीतिमान आहे हे त्याला दाखवून द्यावयाचे होते. पूर्वी त्याने पापांकडे सहनशीलतेने व दयादृष्टीने पाहिले परंतु आता पापांच्या क्षमेसाठी तो त्याचे नीतिमत्व दाखवू इच्छितो. अशा प्रकारे तो दाखवून देतो की, ख्रिस्तावरील श्रद्धेमुळे पापी माणसांचे देवाबरोबरचे संबंध यथोचित केले जातात व हेच त्याचे नीतिमत्त्व आहे.
रोमकरांना 3 वाचा
ऐका रोमकरांना 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांना 3:20-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ