YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रोमकरांना 10:13-17

रोमकरांना 10:13-17 MACLBSI

‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील, त्याचे तारण होईल.’ मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील? ‘शुभवर्तमान सांगणाऱ्याचे पाय किती सुंदर असतात!’ असा धर्मशास्त्रलेख आहे. तथापि शुभवर्तमान सर्वांनी स्वीकारले आहे असे नाही. यशया म्हणतो, ‘प्रभो, आम्ही ऐकलेल्या संदेशावर कोणी विश्वास ठेवला आहे?’ ह्याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शद्बाद्वारे प्राप्त होतो.