YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी प्रस्तावना

प्रस्तावना
ज्या गोष्टी लवकरच घडून येणार आहेत, त्याविषयीचे प्रकटीकरण परमेश्‍वराने येशू ख्रिस्ताला दिले. त्याने ते आपल्या दूताला पाठवून योहानला कळवले. योहानने जे काही पाहिले, ते त्याने येथे सांगितले आहे.
येशू ख्रिस्तावरील श्रद्धेकरिता ख्रिस्ती लोकांचा छळ होत होता, अशा वेळी त्यांनी श्रद्धेत टिकून राहावे म्हणून त्यांना प्रोत्साहन मिळावे ह्या हेतूने हे पुस्तक लिहिले गेले.
ह्या पुस्तकाची भाषा प्रतीकात्मक आहे. सुरुवातीला सात ख्रिस्तमंडळ्यांना लिहिलेली पत्रे आहेत. नंतर स्वर्गातील उपासनेचे वर्णन आहे. पुढे स्वर्गात व पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक घटनाक्रमांविषयी विस्तृतपणे सांगितले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन, मृतांचे पुनरुत्थान, सर्व मनुष्यांचा न्याय, सैतानाचा पराभव आणि मरणावर विजय ह्या त्या भविष्यातल्या घटना आहेत. तारण पावलेल्या लोकांसाठी परमेश्‍वर एक नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करील व तो त्यांच्याबरोबर सदैव राहील.
रूपरेषा
प्रस्तावना 1:1-8
सुरुवातीचा साक्षात्कार व सात ख्रिस्तमंडळ्यांना पत्रे 1:9-3:22
ग्रंथपट व सात शिक्के 4:1-8:1
सात कर्णे 8:2-11:16
मृतांचा न्याय 11:17-11:19
अजगर आणि श्वापदे 12:1-13:18
भिन्नविभिन्न साक्षात्कार 14:1-15:8
परमेश्वराच्या क्रोधाचे सात प्याले 16:1-21
बाबेलचा विनाश, श्वापद, खोटा संदेष्टा व सैतानाचा पराभव 17:1-20:10
अंतिम न्यायनिवाडा 20:11-15
नवीन आकाश, नवीन पृथ्वी, नवे यरुशलेम 21:1-22:5
समारोप 22:6-21

सध्या निवडलेले:

प्रकटी प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन