त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा पंख होते व ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते. “सर्वसमर्थ प्रभू देव पवित्र, पवित्र, पवित्र आहे. तो होता, तो आहे व तो येणार आहे”, असे ते रात्रंदिवस गातात; ते कधीच थांबत नाहीत. राजासनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याला जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान व आभार व्यक्त करणारी गाणी गातात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या पाया पडतात. जो युगानुयुगे जिवंत आहे, त्याची आराधना करतात, आणि आपले मुकुट राजासनापुढे ठेवून म्हणतात, “प्रभो, आमच्या देवा ! गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू पात्र आहेस कारण तू सर्वांना निर्माण केले व तुझ्या इच्छेने त्यांना अस्तित्व आणि जीवन मिळाले.”
प्रकटी 4 वाचा
ऐका प्रकटी 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटी 4:8-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ