YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 4:1-5

प्रकटी 4:1-5 MACLBSI

ह्यानंतर मी पाहिले तो काय आश्चर्य! स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती व जी कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती, ती म्हणाली, “इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन.” लगेच पवित्र आत्म्याने माझा ताबा घेतला. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. त्याचे मुख सूर्यकांत व सादा रत्नांसारखे चमकत होते. राजासनाभोवती सर्वत्र पाचूच्या रंगासारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती आणखी चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. राजासनाकडून विजा, गडगडाट व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या मशाली म्हणजे देवाचे सात आत्मे आहेत.