येशूने त्याचे हे बोलणे आटोपल्यावर आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊक आहे की, दोन दिवसांनी ओलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र क्रुसावर खिळण्याकरता धरून दिला जाईल.” त्यानंतर कयफा नावाच्या उच्च याजेकांच्या वाड्यात मुख्य याजक व वडील जन जमले. येशूला कपटाने धरून ठार मारावे, अशी त्यांनी मसलत केली. मात्र ते म्हणाले, “आपण हे सणाच्या दिवसांत करू नये, केले तर लोकांत दंगल होईल.” येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता, एक स्त्री फार मौल्यवान अत्तराने भरलेली संगमरवरी कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य संतप्त होऊन म्हणाले, “असा अपव्यय कशाला? हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.” परंतु येशूला हे समजले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “ह्या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी एक सत्कृत्य केले आहे. गरीब नेहमी तुमच्याबरोबर असतील परंतु मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. हिने माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले, ते माझ्या उत्तरकार्यासाठी केले आहे. मी तुम्हांला निश्चितपणे सांगतो, सर्व जगात जेथे जेथे शुभवर्तमानाची घोषणा करण्यात येईल, तेथे तेथे हिने जे केले आहे, ते तिची आठवण म्हणून सांगण्यात येईल.” नंतर बारा जणांपैकी एक, यहुदा इस्कर्योत, मुख्य याजकांकडे गेला आणि त्याने विचारले, “मी येशूला धरून दिले तर मला काय द्याल?” त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली. तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.
मत्तय 26 वाचा
ऐका मत्तय 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 26:1-16
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ