YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 21:25-33

लूक 21:25-33 MACLBSI

त्या समयी सूर्य, चंद्र व तारे ह्यांत विलक्षण गोष्टी घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे गोंधळून जाऊन पेचात पडतील. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील. आकाशातील शक्‍तिस्थाने डळमळतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र सामर्थ्याने व मोठ्या वैभवाने मेघांत येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. ह्या घटनांचा आरंभ होऊ लागेल, तेव्हा न डगमगता उभे राहा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आलेला असेल.” नंतर येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला: “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे ह्यांच्याकडे पहा. त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे. तसेच ह्या घडामोडी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखाल की, देवाचे राज्य जवळ आले आहे. मी निश्चितपणे सांगतो, ही पिढी नष्ट होण्यापूर्वी ह्या सर्व घटना घडतील. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणार नाहीत.