YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री प्रस्तावना

प्रस्तावना
इब्री लोकांच्या ख्रिस्तपरिवारातील श्रद्धावंतांना ख्रिस्ती श्रद्धेबद्दल इतका विरोध होत होता की, ते त्यांची श्रद्धा सोडून देतील असा धोका निर्माण झाला होता. प्रस्तुत बोधपत्राचा लेखक त्याच्या वाचकांना दाखवून देतो की, येशू ख्रिस्त हाच देवाचे अंतिम सत्य व प्रकटीकरण आहे. हे करताना पुढील तीन मुद्दे अधोरेखित करण्यात आलेले आहेत:
1) येशू हा देवाचा पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्यामधून तो आज्ञाधारकपणा शिकला. देवाचा पुत्र म्हणून येशू जुन्या करारातील संदेष्ट्यांपेक्षा, देवदूतांपेक्षा व प्रत्यक्ष मोशेपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
2) देवपित्याने असे घोषित केले आहे की, येशू हा शाश्वत याजक असून तो जुन्या करारातील याजकांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
3) येशूवरील श्रद्धेद्वारे श्रद्धावंत व्यक्ती पाप, भय व मृत्यू ह्यांपासून मुक्त होते आणि महायाजक म्हणून येशू खरे तारण प्रदान करतो. ह्या तारणाची पूर्वछाया यहुदी लोकांच्या धार्मिक विधींमधून व पशुयज्ञांमधून पडलेली होती.
इस्राएलच्या इतिहासातील काही विख्यात व्यक्तींच्या विश्वासाची उदाहरणे पुढे करून लेखक आपल्या वाचकांना आवाहन करतो की, त्यांनी त्यांच्या विश्वासाशी एकनिष्ठ राहावे व वाचकांनी येशूवर आपले लक्ष केंद्रित करून दुःख व छळ ह्यांचा सामना करण्यात शेवटपर्यंत टिकून राहावे (अध्याय 11-12). ह्या बोधपत्राच्या शेवटी लेखकाने उपदेश करीत अनेकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत.
रूपरेषा
विषयप्रवेश:ख्रिस्त म्हणजेच देवाचे परिपूर्ण प्रकटीकरण 1:1-3
देवदूतांपेक्षा ख्रिस्त श्रेष्ठ 1:4-2:18
मोशेपेक्षा ख्रिस्त श्रेष्ठ 3:1-4:13
ख्रिस्ताच्या याजकपदाची श्रेष्ठता 4:14-7:28
ख्रिस्ताच्या कराराची श्रेष्ठता 8:1-9:28
ख्रिस्ताच्या यज्ञाची श्रेष्ठता 10:1-39
विश्वासाचे अनन्यसाधारण महत्त्व 11:1-2:29
परमेश्वराला प्रसन्न कसे करावे? 13:1-19
समारोपाची प्रार्थना 13:20-21
शुभेच्छा 13:22-25

सध्या निवडलेले:

इब्री प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन