YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांना 3:24-29

गलतीकरांना 3:24-29 MACLBSI

म्हणजेच आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचविणारे रक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे त्या रक्षकाच्या अधीन नाही. तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे देवाचे पुत्र आहात. तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला जणू परिधान केले आहे. यहुदी व ग्रीक, गुलाम व स्वतंत्र, स्त्री व पुरुष, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूमध्ये एक आहात. तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात, तर अब्राहामचे संतान आणि अभिवचनाच्याद्वारे वारस आहात.