2 तीमथ्य 3
3
1शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे लक्षात ठेव. 2माणसे आत्मकेंद्रित, धनलोभी, बढाईखोर, अहंकारी, दुर्भाषण करणारी, आईबापांना न मानणारी, कृतघ्न, अपवित्र, 3ममताहीन, क्षमा न करणारी, निंदक, असंयमी, उग”, चांगुलपणाचा द्वेष करणारी, 4विश्वासघातकी, हेकेखोर, उद्धट, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, 5आपल्या धर्माचे बाह्यरूप पकडून त्याचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील. अशा लोकांपासून दूर राहा. 6त्यांच्यापैकी काही लोक दुसऱ्यांच्या घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, 7सदा शिकत असूनही सत्याचे ज्ञान मिळवू न शकणाऱ्या भोळ्या स्त्रियांस वश करतात. 8यान्नेस व यांब्रेस ह्यांनी जसे मोशेला अडविले, तसे हेही सत्याला अडवितात. हे लोक विवेकभ्रष्ट व विश्वासासंबंधाने अपयशी ठरलेले आहेत, 9परंतु हे लोक प्रगती करू शकणार नाहीत कारण जसे यान्नेस व यांब्रेस ह्यांचे मूर्खपण उघड झाले, तसे ह्यांचेही सर्वांना उघड होईल.
संकटांपासून बचाव
10परंतु तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीती, धीर, माझा झालेला छळ व माझ्यावर आलेली संकटे ओळखून आहेस. 11अंत्युखिया, इकुन्या व लुस्त्र या ठिकाणी माझ्या बाबतीत जे काही झाले ते व मी जो छळ सहन केला तो तुला ठाऊक आहे. त्या सर्वांतून प्रभूने मला मुक्त केले. 12ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करण्याची जे इच्छा बाळगतात त्या सर्वांचा छळ होईल 13परंतु भोंदू माणसे दुसऱ्यांना व स्वतःला फसवून दुष्टपणात अधिक सरसावतील. 14तू मात्र ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा. 15त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे. 16प्रत्येक धर्मशास्त्रलेख परमेश्वरप्रेरित सत्य शिकविण्यासाठी, असत्याचे खंडण करण्यासाठी, दोष सुधारविण्यासाठी व सद्वर्तनाविषयी बोध करण्यासाठी उपयोगी आहे. 17ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्णपणे निपुण ठरून प्रत्येक चांगल्या कामासाठी सुसज्ज व्हावा.
सुयुद्ध लढल्यावर मिळणारा मुकुट
सध्या निवडलेले:
2 तीमथ्य 3: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.