YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 पेत्र प्रस्तावना

प्रस्तावना
पेत्राचे दुसरे बोधपत्र सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांना उद्देशून लिहिले असून त्यामागचा हेतू हा आहे की, त्या वेळी अनेक खोटे धर्मशिक्षक ख्रिस्ती लोकांना जी चुकीची शिकवणूक देऊ पाहत होते, तिला आळा घालणे. अशा दिशाभूल करणाऱ्या धर्मशिक्षणामुळे अनैतिक वर्तनाला प्रोत्साहन मिळू नये म्हणून लेखक आपल्या वाचकांना दक्ष राहावयास सांगतो. प्रत्यक्ष येशूच्या सहवासात असलेल्या प्रेषितांनी दिलेल्या खऱ्या देवाच्या व प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानास वाचकांनी धरून राहावे, हाच या समस्येवरील तोडगा आहे. विशेषकरून येशू वैभवाने पुन्हा येणार आहे, या शिकवणुकीला विरोध करणाऱ्यांना थारा दिला जाऊ नये, असे लेखक आवर्जून लिहितो.
कुणाचाही नाश होऊ नये, तर सर्वांना आपल्या पापांपासून परावृत्त होण्याची संधी मिळावी, ही प्रभूची इच्छा आहे म्हणूनच या द्वितीय आगमनाला विलंब होत असलेला दिसतो, असे स्पष्टीकरण पेत्राने जोडले आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-2
ख्रिस्ती आमंत्रणाचा आशय 1:3-21
खोटे धर्मशिक्षक 2:1-22
ख्रिस्ताचे द्वितीय आगमन 3:1-18

सध्या निवडलेले:

2 पेत्र प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन