YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 करिंथ प्रस्तावना

प्रस्तावना
करिंथ येथील ख्रिस्ती लोकांबरोबरचे पौलाचे संबंध काहीसे तणावपूर्ण झाले असताना हे बोधपत्र लिहिण्यात आले आहे. काही लोकांनी त्याच्यावर प्रखर टीका केली असतानाही, त्यांच्याबरोबर सलोखा निर्माण करण्याकरिता तो किती उत्सुक होता व संबंध सुरळीत झाल्यावर त्याला कसा आनंद झाला, हे इथे प्रतिबिंबित झालेले दिसते.
पहिल्या विभागात पौल टीकाकारांबरोबर कडक का वागला, ह्याचे समर्थन करताना म्हणतो की, त्यामुळे संबंधितांना पश्चात्ताप करण्याची सुबुद्धी व्हावी, ही आनंददायक गोष्ट आहे. त्यानंतर तो श्रद्धावंत लोकांना यहुदियामधील गरजवंतांना उदार अंतःकरणाने आर्थिक साहाय्य करण्याचे आवाहन करतो. बोधपत्राच्या शेवटच्या अध्यायात पौल त्याच्या प्रेषितपदाविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्या व स्वतःला खरे प्रेषित समजणाऱ्या काही लोकांचा समाचार घेतो.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-11
पौल आणि करिंथ येथील ख्रिस्तमंडळी 1:12-6:16
यहुदिया येथील गरजवंतांसाठी मदतीचे आवाहन 8:1-9:15
पौलाने स्वतःच्या प्रेषितपदाचे केलेले समर्थन 10:1-13:10
समारोप 13:11-13

सध्या निवडलेले:

2 करिंथ प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन