YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 थेस्सल प्रस्तावना

प्रस्तावना
मासेदोनिया ह्या रोमन प्रांताचे थेस्सलनीका हे राजधानीचे शहर होते. ह्या ठिकाणी पौलाने ख्रिस्तमंडळी स्थापन केली. परंतु थोड्याच काळानंतर त्याला यहुदी लोकांनी द्वेषापोटी बराच विरोध केला. कारण पौल जे यहुदीतर लोक यहुदी धर्माविषयी माहिती मिळवू पाहत होते, अशा लोकांना ख्रिस्ती धर्माचा संदेश देऊन आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होत असे. पौलाला थेस्सलनीका शहर सोडून बेरे ह्या ठिकाणी जावे लागले. तिथून काही काळानंतर तो करिंथ येथे पोहचला. त्याचा सोबती व सहकारी तीमथ्य ह्याने त्याला थेस्सलनीका येथील ख्रिस्तमंडळ्यांच्या परिस्थितीविषयी व्यक्तिगत अहवाल पाठविला.
पौलाचे थेस्सलनीकाकरांना पहिले बोधपत्र ख्रिस्ती लोकांना त्यांच्या श्रद्धेमध्ये स्थिर करण्यासाठी व ख्रिस्ती जीवन जगत राहण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी लिहिले होते. ख्रिस्तमंडळ्यांच्या श्रद्धेविषयी व प्रीतीविषयी ऐकल्याबद्दल तो देवाचे आभार मानतो. त्यांच्यामध्ये असताना तो कशा प्रकारचे जीवन जगला होता ह्याचे त्यांना स्मरण करून देतो. ह्या बोधपत्राचे औचित्य साधून तो त्यांना आपले कर्तव्य शांतपणे बजावीत ख्रिस्ताच्या पुनरागमनाची आशेने वाट पाहत राहण्याचे आवाहन करतो.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1
आभार व स्तुती 1:2-3:13
ख्रिस्ती वर्तणुकीविषयी बोध 4:1-12
ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाविषयी 4:13-5:11
अंतिम उपदेश 5:12-22
समारोप 5:23-28

सध्या निवडलेले:

1 थेस्सल प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन