YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान प्रस्तावना

प्रस्तावना
योहानचे पहिले बोधपत्र पुढील दोन हेतूंनी लिहिले आहे:(1) त्याच्या वाचकांना देवाच्या आणि देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहण्यासाठी प्रोत्साहन देणे व (2) त्यांना चुकीच्या धर्मशिक्षणापासून परावृत्त करणे. या जगाशी संपर्क साधल्यामुळे वाइटाची निर्मिती होते, हा या चुकीच्या शिकवणीचा पाया होता. त्या वेळच्या काही खोट्या धर्मशिक्षकांनी असा प्रचार करायला सुरुवात केली होती की, तारणप्राप्तीसाठी या जगातील व्यवहारापासून माणसाने अलिप्त राहावयास हवे. तसेच ते असेही शिकवू लागले होते की, तारण आणि नैतिकता किंवा शेजारधर्म ह्यांचा काही संबंध नाही. प्रस्तुत बोधपत्राचा लेखक ह्या शिकवणीचे खंडण करून असे निवेदन करतो की, येशू ख्रिस्त हा खराखुरा मानव व देव होता आणि जो कोणी येशूवर श्रद्धा ठेवतो व देवावर प्रीती करतो, त्याने इतरांवरही प्रीती करावयास हवी.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-4
अंधार आणि प्रकाश 1:5-2:29
देवाची मुले आणि सैतानाची संतती 3:1-24
सत्य आणि असत्य 4:1-6
प्रीतीचे कर्तव्य 4:7-21
विजयशाली श्रद्धा 5:1-21

सध्या निवडलेले:

1 योहान प्रस्तावना: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन