YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 131

131
परमेश्वराच्या सन्निध निर्धास्त असणे
दाविदाचे स्तोत्र
1हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही.
मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही,
किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही.
2खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे;
जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते;
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.
3हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ
तू परमेश्वरावर आशा ठेव.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 131: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन