YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 10:24-31

मत्त. 10:24-31 IRVMAR

शिष्य त्याच्या गुरूपेक्षा वरचढ नाही किंवा चाकर मालकाच्या वरचढ नाही. शिष्य आपल्या शिक्षकासारखा व चाकर आपल्या मालकासारखा होणे इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हणले तर घरातील इतर मनुष्यांना ते किती वाईट नावे ठेवतील! लोकांचे नको तर देवाचे भय बाळगा. म्हणून त्यांना भिऊ नका, कारण उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे मी तुम्हास अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छतावरून गाजवा. जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. दोन चिमण्या एका नाण्याला विकत नाहीत काय? तरीही तुमच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेशिवाय त्यातील एकही जमिनीवर पडणार नाही. आणि तुमच्या डोक्यावरचे केससुद्धा त्याने मोजलेले आहेत. म्हणून घाबरु नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही अधिक मौल्यवान आहात.