पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते. ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे. माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.” जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे.
विला. 3 वाचा
ऐका विला. 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: विला. 3:21-26
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ